Dapodi News : दापोडी येथे कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी एका तरुणाला कोयत्यासह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 17) रात्री दापोडी येथे करण्यात आली. (Dapodi News) ओमकार उर्फ दाद्या सोमनाथ गायकवाड (वय 21, रा. नेहरूनगर चौक, दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक रवींद्र जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे एक तरुण शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती शुक्रवारी भोसरी पोलिसांना मिळाली.

Chinchwad News : आरोग्य कट्ट्यावर महापालिका सफाई कामगारांनी गिरवले आनंदी राहण्याचे धडे

त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणे अकरा वाजता सापळा लावून ओमकार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. (Dapodi News) भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.