Chinchwad Crime News : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) पहाटे मोरयानगर झोपडपट्टी, चिंचवड येथे करण्यात आली.

सचिन ऊर्फ सोल्जर जटाप्पा हेळवर (वय 22, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई संजय साठे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेळवर हा कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला शनिवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मोरयानगर, चिंचवड येथून कोयत्यासह अटक केली. सहायक उपनिरीक्षक एल. एम. नरवडे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.