Dighi News : पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज – पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.18) दिघीतील मॅगझिन चौकात हि कारवाई करण्यात आली. 

प्रणव सुरेश कांबळे (वय 21, रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने 30 हजार किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. पोलिसांनी आर्म ॲक्ट कलमाखाली त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.