Hinjawadi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल गेट नंबर दोन जवळ, महाळुंगे पुणे येथे करण्यात आली.

प्रणित कल्याण घाडगे (वय 24, रा. बालेवाडीगाव, पुणे) असे अटक केल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना माहिती मिळाली की, श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल गेट नंबर दोन जवळ, महाळुंगे पुणे येथे एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रणित घाडगे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 40 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करत त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप निरीक्षक शाकीर जिनेडी, महेंद्र पाटील तसेच सहा पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार निशांत काळे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस, शैलेश मगर, अशोक गारगोटे यांच्या पथकाने केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.