Pune Crime News : अम्युनेशन फॅक्टरीत बेकायदा प्रवेश करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : खडकी परिसरातील अम्युनेशन फॅक्टरीच्या आवारात बेकायदा प्रवेश करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सागर प्रभाकर चव्हाण (वय 28, रा. युनिस्टार मित्र मंडळ, शांती नगर झोपडपट्टी, विश्रांतवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. खडकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर चव्हाण याने सहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अम्युनेशन फॅक्टरीच्या बर्निंग मैदान येथील संरक्षण भिंतीवरून उडी मारून अनधिकृतपणे अम्युनेशन फॅक्टरीच्या आवारात प्रवेश केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.