Alandi Prostitution Case : वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज  – वेश्या व्यवसाय प्रकरणी आळंदी ( Alandi Prostitution Case) पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी चाकण-आळंदी रोड, आळंदी येथे करण्यात आली.

ओंकार दत्तू चेवले (वय 22, रा. धनेगाव, पो. सोनवती, ता. जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Borivali Building Collapsed : बोरिवलीमध्ये पत्त्यासारखी कोसळली इमारत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी महिलेला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपीने त्याची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी कारवाई ( Alandi Prostitution Case) करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 24 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.