Amruta Fadnavis  : अमृता फडणवीसांबद्दल अश्लील कमेंटप्रकरणी पुण्यात तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील कमेंट्स केल्याबद्दल एका तरुणाला पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अमित वायकर (रा.कावळे मळा, चाळकवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत भाजपच्या नेत्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलीसात तक्रार दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमित वायकर हा मोबाईलवर फेसबुक सोशल मीडिया बघत होता. त्यावेळी त्याने एका वृत्तपत्रात बातमी पाहीली. ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याची ती बातमी होती. बातमी वाचत असताना त्याने कमेंटमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक अश्लील टिपण्णी केली. ही टिपण्णी अतिशय खालच्या भाषेत असल्याची माहीती आहे.

अमितने केलेली कमेंट सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाली. राजकारणातील एका मोठ्या आणि मोठ्या व्यक्तीच्या पत्नीबद्दल असे शब्द वापरल्याने खळबळ उडाली. याची दखल जुन्नरच्या भाजप नेत्या आशा बुचके यांनी घेतली. त्यांनी या तरुणाबद्दल आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अमित वायकर याला अटक केली आहे.याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.