Chinchwad Crime : लोखंडी सत्तुरसह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Chinchwad Crime) पोलिसांनी एका तरुणाला सत्तुरसह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.15) रात्री संभाजीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.

 

रोहित बालाजी वाघमारे (वय 27, रा. हारंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विपुल जाधव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Bhosari News : जाब विचारल्याने दोघांवर सत्तुरने वार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण शस्त्र घेऊन बर्ड व्हॅली हॉटेलच्या शेजारी संभाजीनगर चिंचवड येथे आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. (Chinchwad Crime) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तुर पोलिसांनी जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.