कात्रज येथे पिस्टल व काडतूसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कात्रज (Katraj) तळ्याजवळून पोलिसांनी एका तरुणाला पिस्टल, जिवंत काडतूसासह अटक केली आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी (दि.6) केली आहे.

संकेत मिलींद गोवेकर (वय.22 रा.फलटण) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की, कात्रज तळ्याजवळ एक जण शस्त्रासह वावरत आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून संकेत याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व 1 जिवंत काडतूस आढळले. ते जप्त करण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Katraj) त्याच्या विरोधात आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Development of Chakan : चाकणच्या विकासासाठी महानगरपालिकेची गरज – राजेश अग्रवाल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.