Waki Phata : वाकी फाटा येथे पिस्टलसह तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (Waki Phata) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 1) खेड तालुक्यातील वाकी फाटा येथे करण्यात आली.

ऋषिकेश उर्फ बाळा राजेंद्र वाडेकर (वय 24, रा. शिरोली, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Rahatani : अवघ्या पंधरा मिनिटात घरातून अडीच तोळ्याचे दागिने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकी फाटा येथे एक (Waki Phata) तरुण संशयीतरीत्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास सापळा लावून ऋषिकेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.