Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II


रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल लष्करे, विशाल माने, आकाश भिसे, राजेश (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रतन शुक्रवारी दुपारी दळण आणण्यासाठी चालले होते. दरम्यान, आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणांच्या वादातून त्यांना शिवीगाळ करीत बांबूने तसेच हाताने मारहाण केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.