Sangvi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला चौघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला सिमेंटचा ब्लॉक आणि बॅटने मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरव येथे 29 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.

प्रज्वल संजय शिर्के (वय 18, रा. नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोशन साळुंके, स्वप्नील गाडुते, चेतन कदम (तिघे रा. जुनी सांगवी), पियुष शेळके (रा. नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारी रोजी पिंपळे गुरव येथे नाईट क्रिकेटच्या मॅच होत्या. त्या पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे मित्र विकास ढोबळे, रमेश सुतार हे गेले होते. त्यावेळी आरोपींनी तिथे येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. चेतन कदम याने ‘आता कुठे जाशील, मागच्यावेळी तुला सोडला होता’ असे म्हटले. रोशन याने कोयत्याने, पियुष याने सिमेंटच्या ब्लॉकने तर स्वप्नील याने बॅटने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.