Pimple Gurav : टोळक्याकडून दहशत पसरवत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज- टोळक्याने घरात घुसून तुमच्या पुतण्या कोठे आहे अशी विचारणा करत तोडफोड करून दहशत पसरवली. रविवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी मनोज शंकर कचरे (वय 38, रा.पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून कीव्हन जॉर्ज ऍंथोनी (वय 25), विक्रांत गौतम जाधव (वय 25), अनुप उल्हास चव्हाण (वय 25), ऍंथोनी जॉर्ज फर्नांडिस (वय 22, रा.खराळवाडी) याना अटक करण्यात आली असून इतर तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी टोळके रविवारी दुपारी फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादी यांचा पुतण्या सोनू कोठे आहे अशी विचारणा करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराबाहेर पार्क केलेल्या मोटार व दुचाक्यांची तोडफोड केली. तसेच आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवली. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना अटक केली तर त्यांचे इतर साथीदार पसार झाले. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.