Nigdi : जास्त परताव्याच्या आमिषाने सव्वा चार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- जास्त परताव्याचे आमिष दाखवत बिट कॉईन खरेदी करण्यास सांगत एकाला सव्वा चार लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सागर नंदकुमार कदम (वय 32, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली असून संजय सूर्यभूषण गौर (रा.लखनौ , उत्तरप्रदेश) व सुयश सुर्वे (रा.चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व फिर्यादी यांची टेलिग्राम ग्रुपवर ओळख झाली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांना बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच जास्त परताव्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2018 या कालवधीत ऑनलाईन माध्यमातून 4 लाख 30 हजार रुपये हस्तांतरित केले. मात्र परताव्यासाठी पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारअर्जानुसार शुक्रवारी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर क्राईम विभाग अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.