Pimpri Crime : मैत्रिणीच्या संशयास्पद मृत्यू नंतर मित्राची ही गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – येरवडा येथे  एका अल्पवयीन मुलीचा (Pimpri Crime) संशयास्पदरित्या मृतदेह सापडला होता.. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मित्राने खराळवाडी येथे  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (शुक्रवारी) दुपारी घडली.

 

जयेश रामदास मंगळवेढेकर (वय 25, राहणार खराळवाडी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

 

Punawale News : अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष, पुनावळेतील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी

 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयेश याच्या खराळवाडी येथील मैत्रिणीचा मृतदेह येरवडा येथे संशयास्पद रित्या सापडला होता.या प्रकरणी तिच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार जॉनी कुरियन, राजेश कांबळे, जनक शाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी फिर्यादी यांच्या मुलीकडे पैशांच्या व्यवहाराचा तगादा लागवल्याने तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर जयेश हा खूप अस्वस्थ होता. (Pimpri Crime) त्याने आत्महत्येचा या आधीही प्रयत्न केला होता. त्यांनतर त्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा  पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.