Chinchwad : हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कद्वारे तरुणाची अकरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर अधिक परतावा देण्याचे आम्हीच दाखवत तरुणाची दहा लाख 95 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 ते 17 मे या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडला.

Pune : पर्यावरण दिनी पुण्यात ‘तेर एन्व्हायरॉथॉन’चे आयोजन

गणेश मुकुंद अमृतकर (वय 28, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड (Chinchwad) पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम चॅनल धारक आणि अन्य अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी टेलिग्राम चैनल द्वारे फिर्यादी यांच्याशी संवाद साधला. एका वेबसाईट द्वारे कमिशन देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देण्यात आले. हॉ

हॉटेलला रेटिंग देण्याचे टास्क देऊन त्यावर अधिक परतावा देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेत त्यांची एकूण दहा लाख 95 हजार 82 रुपयांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड (Chinchwad) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.