Pimpri : युवासेनेचा शहरातील अनधिकृत होर्डिंगला दणका

एमपीसी  न्यूज – पिंपरी युवासेनेने निदर्शनास आणलेले अनाधिकृत होर्डिंग त्वरित काढाव्यात, अशी मागणी पिंपरी युवा सेनेतर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाचे आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी वाघमारे यांना निवदेन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. असे युवासेनेचे जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे बोलले. लवकरात-लवकर कारवाई करू, असे लेखीनिवेदन वाघमारे यांनी पिंपरी युवासेनेला दिले. यावेळी युवासेनेचे जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, रुपेश कदम, पिंपरी युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, उपविभागप्रमुख भोला पाटील, राहुल पलांडे, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, मनोज मातंग, सनी कड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.