Pune News : पुण्यातून पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडक परिसरातून एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोहम्मद अमान अन्सारी असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. (Pune News) 2015 पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ राहत होता.

H3N2 : टेंशन वाढवलं! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला

 

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी हा 2015 पासून पुण्यातील भवानी पेठेत बेकायदेशीर पणे राहत होता. अवैधरित्या गेल्या 8 वर्षांपासून तो इथे वास्तव्यास होता.(Pune News) पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक बनावट पाकिस्तानी पासपोर्ट आढळून आला असून त्याने या पासपोर्टचा वापर करून दुबईला देखील प्रवास केला होता

खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.