Criminal Arrested : बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाचा खून; दोघा सराईतांना अटक

एमपीसी न्यूज: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने दोन सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाचा खून केला. सात दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Tadoba Reservoir : वाघीणीसमोरच पर्यटक ‘जिप्सी’तून कोसळला; ताडोबा येथील घटना

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल अमराळे (वय 35) आणि लहू माने (वय 40) या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हर्षदा निखिल अनभुले (वय 24) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत निखिल याने आरोपींकडून बेटिंग करण्यासाठी काही पैसे घेतले होते. हे पैसे परत करावे यासाठी आरोपी त्याला फोन करून सातत्याने धमक्या देत होते. 15 नोव्हेंबर रोजी आरोपींनी त्याला भारतीय विद्यापीठ परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर कोंडून ठेवत त्याला बेदम मारहाण केली. डोक्यावर आणि छातीवर गंभीर जखम झाल्याने निखिल याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोघाही आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.