Chinchwad : युवा नेते सूरज बाबर यांचे पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना, मंडळांना, तसेच सामाजिक संस्थाना, जाहीर आवाहन करण्यात येते की कराड, सांगली, कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील नागरिकांना औषधं, अन्नधान्याची जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची नितांत गरज असून, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन युवा नेते सूरज गजानन बाबर आणि मित्र परिवार यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून आपल्या जवळील कपडे, धान्य, भाजीपाला, दूध, ब्लॅंकेट, औषधे, फूड पॅकेट, चादरी, सॅनिटरी नॅपकिन्स, तेल ब्रश आणि टुथपेस्ट, चिवडा अशा अनेक अत्यावश्यक वस्तूंची मदत करावी. सर्वत्र नागरिक एकत्र येऊन एकमेकांना मदत करीत आहे. आधार देण्याचे काम करीत आहे. तरी आपण सर्वांनी मिळून हातभार लावून पूरग्रस्त खालील सूचित केलेल्या पत्त्यावर मदत पाठवावी – दिनांक 10 ऑगस्ट , हॉटेल बर्ड व्हॅली, रावेत+918237729090 या ठिकाणी संपर्क साधून मदत पोच करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.