Lonavala: तुंगार्ली धरणात पोहताना युवक बुडाला; शोधकार्य सुरु

एमपीसी न्यूज :  लोणावळ्यातील तुंगार्ली धरणामध्ये पोहताना दमछाक होऊन, मुंबईतील जोगेश्वरी येथील एक युवक बुडाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. 

साद जावेद घिवाला (वय-23, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे या तरुणाचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साद आणि त्याचे इतर पाच मित्र आणि मैत्रिणी सोबत त्यांच्या क्रेटा कारने लोणावळ्यात फिरायला आले होते. यावेळी ते लोणावळ्यातील तुंगार्ली येथील तुंगार्ली परिसरात गेले होते. फिरत असताना साद आणि त्याचे इतर दोन मित्र फरीद व नोमान हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. यादरम्यान साद आणि नोमान पोहत असताना सादची दमछाक झाली व बुडू लागला होता. यावेळी सादने त्याच्या मित्रांना आवाज दिला असता नोमानने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. यावेळी नोमानचीही दमछाक झाल्याने तो बुडू लागल्याने त्याने प्रयत्न करत कसाबसा डॅमचा किनारा गाठत स्वःताचा जीव वाचविला त्याने आणि त्याचा मित्र फरीदने याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती कळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे अमोल गायकवाड, पवन तायडे, विजय मुंडे व सुनील देशमुख व शिवदुर्गचे अमोल परचंड, महेश मसने राजु पाटील, राहुल देशमुख, तुशार केंडे, सागर कुंभार, निकेत तेलेंगे, दुर्वेश साठे, अनिकेत आंबेकर, स्वप्निल भांगरे,गणेश गायकवाड, अनिल सुतार, मधुर मुगंसे, राजु कडु, आनंद गावडे, सुनिल गायकवाड, विकास मावकर, हरपल जाधव, सौरभ मावकर, आकाश अंभोरे, दिनेश पवार यांनी सायंकाळ पर्यत शोधमोहिम राबवली मात्र अद्याप सादचा शोध लागलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.