Pune : डोक्यात बिअरची बाटली मारून तरुणाचा खून; तीनजण अटकेत

एमपीसी न्यूज- प्रेम प्रकरणातून चौघांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून खून केला. पार्टीनंतर झालेल्या वादातून हा प्रकार घडला. कोथरूड भागातील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अक्षय झोरी ( वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, झोरी आणि त्याचे इतर चार मित्र रात्री पार्टीसाठी बाहेर गेले होते. दरम्यान रात्री साडेतीन वाजता चांदणी चौकातील जैन लोहिया आयटी पार्कजवळ आले असताना अक्षय व मित्रांचा किरकोळ वाद झाला. या वादातून चौघांनी अक्षयला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण पसार झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.