Pimpri : नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी व्यवसाय करावा- डॉ. कैलास कदम

हुंबरी ग्राम सेवा संघाचा सातवा स्नेह मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – कोकणी तरुणांनी नोकरीच्या मागे ना लागता व्यवसाय करावा. त्यामुळे रोजगाराची समस्या संपुष्टात येईल असे डॉ. कैलास कदम यांनी सांगितले. ते हुंबरी ग्राम सेवा संघ पुणे आयोजित सातव्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. 

यावेळी  कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, मनोहर लाड, हुंबरी ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, कॅप्टन शिवाजी कदम, गंगाराम जाधव, विष्णू कदम, बाळकृष्ण कदम, किरण यादव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, आज कोकणी पाच जिल्हे आहेत. मात्र, आज कोकणी युवक क्रीडा, सास्कृंतिक, आणि उद्योगधंद्यामध्ये मागे आहे. आज कोकणी युवक नोकरीच्या मागे लागतो. त्यामुळे त्याच्या कलागुणांना वाव मिळत नाही. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या कला गुणांना वाव करून द्यावा, असे ते म्हणाले. यावेळी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तसेच मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जंगम व प्रविण लाड यांनी केले. तर आभार राजेंद्र कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोहर कदम, प्रमोद लाड, महेश कदम, दत्तात्रय कदम, अजय कदम, यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.