Pune News : होळी पौर्णिमेच्या दिवशी गोळीबार, वेल्ह्यात तरुणाचा गोळ्या झाडून खून

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात होळीच्या दिवशीच एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्यात एकाची गोळ्या घालून हत्या  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune News) ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. या गोळीबारानंतर परिसरात सगळीकडे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण परसलं आहे. ऐन होळीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे .

गोळीबार होऊन हत्या झाल्याची माहिती दुपारी पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरु केला आहे. नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे  (रा. पाबे, रामवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणूसे हे वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

Chinchwad : डेरवण युथ फेस्टिव्हल स्पर्धेसाठी हेवन जिम्नास्टीक अकादमीचे 8 खेळाडू घेणार सहभाग

नवनाथ रेणूसे यांची हत्या करणारे आरोपी हे त्यांच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे. खून झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडण्यात आल्या असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली आहे. (Pune News) रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत. वेल्हे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.