Pune : दुचाकी रॅली काढत सिद्धार्थ शिरोळे यांना युवकांचा पाठींबा

एमपीसी न्यूज – भाजपा, शिवसेना, रिपाई (A), रासप, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे शिवाजीनगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज युवकांनी टू व्हीलर रॅलीचे आयोजन केले होते.

कामगार पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रस्ता, गुडलक चौक, फर्गसन रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, हनुमान नगर, गोखले नगर दीप बंगला चौक, खडकी गाव, खडकी बाजार, आंबेडकर चौक, औंध रस्ता, ब्रेमन चौक, औंध गाव या मार्गाने ही रॅली गेली. शहरात पाऊस असतानाही युवक कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह यावेळी प्रकर्षाने जाणवला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, शिवसेनेचे आनंद मंजाळकर, नगरसेविका स्वाती लोखंडे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगसेवक आदित्य माळवे, नगसेविका राजश्री काळे, नगरसेविका सोनाली लांडगे, नगासेविका अर्चना मुसळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका सुनीता वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या बरोबरच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता या वेळी मुस्लिम समाजाने युतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर पाठींबा दिला. मेळाव्याचे आयोजन सैफ सय्यद यांनी केले होते. खासदार अनिल शिरोळ, नगरसेवक विवेक शिंदे, नगरसेविका स्वाती लोखंडे, मुस्लिम समाजाचे फेरोज कच्छी, संतोष डांगे, नजीर शेख, भैय्या पटेल, सलीम मौलाना, अली सय्यद, मलंग सय्यद, तात्या धाकतोडे, फारूक शेख, ललित काकडे, अरबाज बागवान, राज कोळी, मीरा सय्यद यावेळी उपस्थित होते.

याशिवाय काल नगरसेविका व महिला व बालकल्याण विकास मित्र परिवाराच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्यातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. या वेळी प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.