Pimpri: घरात येऊ न दिल्याने एकाला बेदम मारहाण

youth was beaten for not allowing him to enter the house in pimpri-chinchwad

एमपीसी न्यूज- घरात येऊ न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.26) दुपारी पावणे दोन वाजता शेल पेट्रोल पंपासमोर घडली.

धिरेन मानस काळे (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरीफ पवार (वय 30), बाका उर्फ दिनेश निलेश काळे (वय 25, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड), बंटी काळे (वय 22, रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धिरेन यांनी आरोपी शरीफ याला घरात येऊ दिले नाही. या कारणावरून तिन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून धिरेन काळेला मारले. त्यात शरीफ याने धिरेन यांच्या डोक्यात रॉड मारून जखमी केले. तर आरोपी बंटी याने हॉकी स्टिकने मारले. तिन्ही आरोपींनी मिळून धिरेन यांचा मेहुणा अतिष यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.