Maval Crime News : सांगवडे गावात आढळला तरुणाचा मृतदेह; खून करून मृतदेह फेकल्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे गावात एका पडक्या घरामध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह पडक्या घरात टाकला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 19) उघडकीस आली आहे.

भोसरी मधील गुळवे वस्ती येथे एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच मावळ तालुक्यातील सांगवडे गावात आणखी एक खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगवडे गावातील एका पडक्या घरामध्ये तरूणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. घराच्या आजूबाजूला फरफट केल्याचे आढळले असल्याने तरूणाचा खून करून त्याचा मृतदेह घरात टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.