Youtube Channel : यूटय़ूब’ देताय नितीन गडकरी यांना महिन्याला 4 लाख, पण का ?

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सध्या ‘यूटय़ूब’कडून दर महिन्याला चार लाख रुपये मिळत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात घरात बनवलेल्या रेसिपी तसेच लेक्चर्सच्या व्हिडीओंनी त्यांच्या मासिक उत्पन्नात ही मोठी भर टाकली आहे. टाइमपास म्हणून बनवलेल्या व्हिडीओंनी ही कमाल केलीय, असा मजेदार किस्सा गडकरींनी इंदूरच्या कार्यक्रमात ऐकवला.

ते गुरुवारी विविध रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाने मला दोन गोष्टी दिल्या. मी घरामध्ये ‘यूटय़ूब’ बघत जेवण बनवायला सुरुवात केली. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर्स देऊ लागलो.

अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी, विद्यापीठे अशा बऱयाच ठिकाणी भाषण देण्याची संधी मिळाली. त्याचे व्हिडीओ ‘यूटय़ूब’वर अपलोड केले. या व्हिडीओंना मोठय़ा प्रमाणावर ह्यूअर्स लाभले आहेत. त्यामुळे आज मला ‘यूटय़ूब’कडून दर महिन्याला चार लाख रुपये मिळत आहेत. अशा कमाईची मी कधी कल्पनाही केली नव्हती, असे गडकरी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.