Yusuf Pathan Retire’s : युसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. युसूफने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आभार मानले आहेत.

युसूफ पठाणने एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लहानपणापासून माझं आयुष्य क्रिकेट भोवतीच फिरत राहिले. भारतासाठी खेळणं माझ्यासाठी सर्वोच्च मान होता. दोन विश्वचषक जिंकणे. विश्वचषक जिंकल्यावर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेणं हे आयुष्यातील काही खास क्षण असल्याचे त्यांने म्हटले आहे.

चेन्नई आणि कोलकातामधून आयपीएलसाठी खेळणं ही देखील एक संधी होती, असं त्यानं आपल्या पत्रात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

युसूफ पठाणने भारताकडून 57 एकदिवसीय सामने खेळत 810 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, 22 T20 सामन्यात त्याने 146 च्या स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या आहेत. चेन्नई आणि कोलकातामधून आयपीएलसाठी 174 सामने खेळत 3,204 धावा कुटल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.