Pimpri : युवासेनेतर्फे आदर्श शिक्षकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – “फुलावर तर सगळेच प्रेम करतात पण जे फुलासोबत काट्यावरही प्रेम करतात ते शिक्षक असतात. “शिक्षक दिनाचे औचित्य साधून पिंपरी युवा सेनेने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आदर्श शिक्षकाचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.

मोहननगरमधील सतीश मेहेर, कुलकर्णी, तात्यासाहेब जाधव, रवी कोवे, सोनवणे, नवले, भिसे, दत्ता जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, नगरसेविका मीनल यादव, युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अजित बोराडे, रवी नगरकर, नितीन वाघमारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.