Kiwale News : विकासनगरमधील पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट, युवा सेनेची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरभर सर्वत्र कलरचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम चालू असताना विकासनगर, किवळे, मामुर्डी या भागातच साधे पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामे सुरु असून तेही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे या कामाची व कामाच्या दर्जाची चौकशी करावी, अशी मागणी युवा सेना उप शहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत तरस यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण शहरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे. सर्वत्र कलरचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या उलट विकासनगर, किवळे, मामुर्डी या भागात साधे ब्लॉक बसविले जात आहे. हा दुजाभाव का, याचे उत्तर द्यावे. तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी तरस यांनी केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्यावतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत एमबी कॅम्प येथे जॉगिंग ट्रॅक व उद्यानाचे काम सुरु आहे. हे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाच झाले असून त्याचीही चौकशी करण्यात यावी, हे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत समाविष्ट करावे. किवळे -विकासनगर भागात ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला. मात्र, हा निधी नेमका कुठे गेला हेही जाहीर करावे, अशी मागणी सुद्धा तरस यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.