Yuvraj On Sanjay Dutt: ‘मला त्या वेदना माहीत आहेत, पण तू फायटर आहेस’

Yuvraj Singh posts heartfelt message for ‘fighter’ Sanjay Dutt, wishes him ‘speedy recovery’ from lung cancer मला माहीत आहे तू या कठीण काळातून सुरक्षित बाहेर येशील. तू लवकर बरा व्हावा यासाठी माझी प्रार्थना आहे, असे युवराज सिंग याने ट्वीट् केले आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात तो दाखल झाला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती आली आहे.

संजय दत्त लवकर बरा व्हावा यासाठी सर्व स्तरातून त्याचे चाहते व शुभचिंतक प्रार्थना करत आहेत. टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंगने देखील संजय दत्त लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

युवराज सिंग याने ट्वीट् करत संजय दत्तच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तो म्हणाला की, मला त्या वेदना काय असतात हे माहीत आहे. पण तू नेहमीच फायटर राहिला आहेस. मला माहीत आहे तू या कठीण काळातून सुरक्षित बाहेर येशील. तू लवकर बरा व्हावा यासाठी माझी प्रार्थना आहे, असे युवराज सिंग याने ट्वीट् केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागणार आहे. बहुचर्चित केजीएफ-2 या सिनेमात त्यांने खलनायकाची भूमिका केली आहे. सिनेमासह त्याच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे संजय दत्त याने कर्करोगाला हरवून परतावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.