Yuvraj Singh : सोशल मीडियावर का होतंय हॅशटॅग ‘मिस यू युव्ही ट्रेन्डिंग’?

Why is the hashtag 'Miss You UV Trending' on social media?

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग ‘मिस यु युव्ही’ वापरत त्याची आठवण काढली आहे.

भारतीय संघाचा मधल्या फळीचा आधारस्थान असलेल्या युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून देण्यात युवराज सिंगने योगदान दिले आहे.

युवराजचा 2007 चा T20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. 2007 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांच्या लक्षात आहे.

आज (बुधवारी) अचानक सोशल मीडियावर #MissYouYuvi हे ट्रेंड होऊ लागले आहे.

युवराज सिंग याने गतवर्षी याचदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कॅन्सरवर मात करून युवी क्रिकेटच्या मैदानावर उतरला, परंतु त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आलं.

2017मध्ये त्यानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीच्या एका वर्षानिमित्तानं सोशल मीडियावर #MissYouyuvi हे ट्रेड होत आहे.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा फेसबुकवर युवराज सिंग सोबत फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

युवराज सिंग यांने 40 कसोटी सामन्यात 33.93 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत. युवराजने 304 एकदिवसीय सामने खेळले असून 36.56 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यात 14 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.

आपल्या T20 कारकिर्दीत त्यांने 58 सामने खेळत 28.02 च्या सरासरीने 1177 धावा कुटल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.