PCMC News: झगडे यांचा ‘एलबीटी’ विभाग जांभळे यांच्याकडून काढला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांचा ‘एलबीटी’ विभाग अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडून काढण्यात आला. स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग तिसरे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला असून याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी आज (शुक्रवारी) काढला आहे.

अतिरिक्त आयुक्त एक या पदावरुन विद्यमान अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे आणि स्मिता झगडे यांच्यात जुंपली आहे. अतिरिक्त आयुक्त एक या पदाचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये प्रलंबित आहे. विद्यमान अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्या नियुक्तीला आव्हान देणा-या उपायुक्त स्मिता झगडे या विभागाच्या आढावा बैठका आणि महापालिका सभांना गैरहजर राहत असल्याचे कारण पुढे करत आणि जांभळे यांच्या तक्रारीवरुन आयुक्त शेखर सिंह यांनी झगडे यांना नोटीस बजाविली आहे. त्यामुळे त्यांच्यातील वाद चिघळला.

Pimpri News: केंद्राच्या सिंगल युज प्लॅस्टिकच्या वापराबाबत नियम शिथिल करण्याला बहुतांश पर्यावरण संस्थांचा विरोध

दरम्यान, तक्रारीत कोणतेही तत्थ नाही. कोणतीही प्रकरणे प्रलंबित नाहीत. जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. रेकॉर्ड खराब करण्याचा मानस दिसून येत असल्याचे सांगत झगडे यांनी आयुक्त सिंह यांच्याकडे दाद मागितली. तसेच आपला एलबीटी विभाग दुस-या अतिरिक्त आयुक्तांकडे देण्याची विनंती केली. आयुक्त सिंह यांनी ती विनंती मान्य करत जांभळे यांच्याकडील एलबीटी विभाग काढला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे एलबीटी विभागाचे नियंत्रित अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे झगडे यांच्यासाठी एलबीटी विभागासाठी आता जगताप अतिरिक्त आयुक्त असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.