Pune News : झीनत शर्माने फेसबुकवरील न्यूड कॉलचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज : फेसबुकवर न्यूड कॉल केल्यानंतर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका अज्ञात तरुणीने 35 वर्षीय तरुणाकडून साडेपाच लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी Zeenat Sharma या फेसबुक अकाउंट धारक तरूणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धानोरी परिसरातील एका पस्तीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मे महिन्यात फिर्यादीला जीनत शर्मा या फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादीने ती स्वीकारली. आरोपी मुलीने त्याला काही कालावधीनंतर फेसबुक मेसेंजर वर न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने ही त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानेही लग्न होत फेसबुक मेसेंजरवर आरोपी मुलीशी संवाद साधला.

आरोपीने नेमका हाच व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी कडून वेळोवेळी पाच लाख 54 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेतले. दरम्यान इतके पैसे दिल्यानंतर आणखी पैशाची मागणी होत असल्याने फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.