Pune : एमआयएमचे जुबेरबाबू शेख वंचित आघाडीत

एमपीसी न्यूज – एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि मुस्लिम समाजातील समाजिक कार्यकर्ते जुबेरबाबू शेख यांनी आज वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत वंचित आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला पुण्यात मोठा धक्का मानला जात आहे. मुस्लिम समाजाला 25 तिकिटे देण्याचे अगोदरच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. शेख यांच्या प्रवेशाने आगामी काळात वंचित आघाडीची ताकत वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जुबेरबाबू शेख हे गेली 20 वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय कार्यरत आहेत. मुस्लिम समाजातील युवकांमध्ये त्यांची प्रचंड पकड असून ते मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक आणि इतर विषयावर ते आक्रमकपणे काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी एमआयएमचे अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत एमआयएमचे पुणे महापालिकेत खाते उघडून एक नगरसेवक निवडून आणला. असे तर 20 तर 22 ठिकाणी उमेदवार उभे करून महापालिका निवडणुकीत तब्बल 75 हजारापेक्षा ही जास्त मतदान घेऊन सर्वांनाचं आश्चर्य चकित केले होते. यावेळी दादा बोर्डे, वंचितचे प्रवक्ते संतोष संखद, बत्ते खान, आरिफ भाई मुगडे, जावेद शेख, रफीक बागवान, मोहसीन बागवान, बाबासाहेब हजारे, अझर शेख, इम्रान शेख उपस्थित होते.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like