Corona Vaccine : 12 वर्षांवरील मुलांना आता ‘झायडस-कॅडीला’ लस, डिसेंबरपर्यंत लसीचे तब्बल 4 कोटी डोस

एमपीसी न्यूज : कोरोनाविरोधात लढण्यासाठी 12 वर्षांवरील मुलांना आता ‘झायडस-कॅडीला’ या कंपनीने बळ दिले आहे. झायडसच्या ‘झायकोव-डी’ या लसीच्या आपत्कालीन मंजुरीला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हर्शिल पटेल यांनी कोविड लढाईचा ताळेबंद मांडला. ही लस सुईमुक्त असून मुलांसाठी ती संजीवनी गुटिकाच ठरणार आहे. डिसेंबरपर्यंत लसीचे तब्बल 4 कोटी डोस तयार होतील, असा दावा पटेल यांनी केला.

हिंदुस्थानच्या झायडस केडिलने ‘झायकोव डी’च्या लसीला परवानगी देण्याचा प्रस्ताव जुलै महिन्यात केंद्रीय औषध नियंत्रण महामंडळाकडे सादर केला होता. अखेर तिच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत सिरम इन्स्टिटय़ूटची कोव्हिशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन ऍण्ड जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना झायडसचे डॉ. शर्विल पटेल म्हणाले की, सध्या या लसीचे उत्पादन करण्यास आम्ही सुरुवात केली असून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत तब्बल 3 ते 4 कोटी डोस तयार करण्याचा आमचा मानस आहे. लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लसींचे नियम समान आहे. आतापर्यंत आम्ही 30 ते 50 लाख डोसचा साठा करून ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऑक्टोबरपासून प्रत्येक महिन्याला लसीचे एक कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.

मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागणार आहेत. दुसरा डोस 28, तर तिसरा डोस 56 दिवसांनी द्यावा लागेल.
सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशभरातील रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध
होईल. लसीची किंमत मात्र पुढील आठवडय़ात जाहीर केली जाईल.

ही पहिली डीएनए लस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही इंट्राडर्मल लस असून सुई न वापरता ट्रॉपिस वापरून दिली जाणार आहे.

कंपनीने हिंदुस्थानात 12-18 वयोगटातील मुलांसाठी सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी घेतली आहे. 50 पेक्षा जास्त केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.