Auto accident : रिक्षाच्या अपघातात  तिघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज –  भरधाव वेगात आलेल्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील तिघेजण गंभीर जखमी झाले. (Auto accident) ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर सुतारवाडी येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shriniwas patil : रामचंद्र देखणे यांनी सांगितला संतसाहित्याचा भावार्थ – श्रीनिवास पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई वडील आणि बहिणीचे पती रिक्षातून जात होते. ते सुतारवाडी येथे आले असता त्यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धक्का दिला.(Auto accident) त्यात त्यांची रिक्षा पलटी झाली आणि रिक्षातील तिघेजण जखमी झाले. अपघात घडल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.