Bhagwangad : श्री क्षेत्र भगवानगडावर उभारणार सर्वाधिक भव्य संत ज्ञानेश्वर मंदिर

एमपीसी न्यूज –  श्री क्षेत्र भगवानगड येथे महाराष्ट्रातील  सर्वाधिक भव्य ( Bhagwangad ) दिव्य असे संत ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात येणार आहे .या संदर्भातील माहिती देण्यासाठी श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांची नगर जिल्ह्यामध्ये आले असता सदिच्छा भेट घेतली.

हजारो लोकांच्या वर्गणीतून हे भव्य असे संत ज्ञानेश्वर मंदिर  बांधण्यात येणार आहे. मोहन भागवत यांनी डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांच्याकडून या मंदीराची सर्व माहिती जाणून घेतली तसेच  त्यांचे  अभिनंदन केले .

Talegaon Dabhade: संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

पुढील वर्षांमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाचा अमृत महोत्सव आहे . यावेळी भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह सर संघचालक ,मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना भगवानगडावर  निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा श्री शेत्र भगवानगडाचे सचिव श्री गोविंद घोळवे यांनी यावेळी ( Bhagwangad ) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.