Bhosari : ‘आयुष्यमान भारत योजने’चे अर्ज स्वीकृती केंद्र भोसरीत सुरु

आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात अर्ज स्वीकृती केंद्र, अर्ज करण्याचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’साठी अर्ज करणे भोसरीतील नागरिकांना आता सोपे होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात योजनेचे अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार असून नागरिकांनी अर्ज जमा करण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार पात्र लाभार्थी कुटुंबियांच्या याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. योजनेच्या लाभार्थी पत्राचे वाटप सुरु करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुलभ रितीने मिळण्यासाठी पात्र कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्याला ई-कार्ड वाटप केले जाणार आहे. पात्र लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना त्यांना मिळालेल्या प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र, त्यामध्ये नमूद सदस्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड, शासकीय ओळखपत्र देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

2014 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी असल्यास खासगी, शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय उपचाराकरिता पाच लाखापर्यंतचा खर्च निशुल्क आहे. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे.

‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चे अर्ज स्वीकृतीचे केंद्र भोसरीत सुरु करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील शीतलबाग येथील जनसंपर्क कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.