३० ऑक्टोबर : दिनविशेष

What Happened on October 30, What happened on this day in history, October 30. See what historical events occurred, which famous people were born and who died on October 30.

३० ऑक्टोबर : दिनविशेष – आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

३० ऑक्टोबर – महत्वाच्या घटना

  • १९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

    १९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

    १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

    १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

    १९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

    १९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

    २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

३० ऑक्टोबर– जन्म

  • १७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

    १८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

    १९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

    १९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

    १९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

    १९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

    १९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

३० ऑक्टोबर– मृत्यू

  • १८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

    १९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

    १९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

    १९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

    १९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

    १९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

    १९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

    २००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.

    २०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.