Talegaon : भावी वकिलांसाठी अभिरूप न्यायालय स्पर्धा अत्यंत उपयुक्त – ॲड. मंगेश खराबे

एमपीसी न्यूज –  अभिरूप न्यायालय स्पर्धा ही भावी वकिलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. अभिरुप न्यायालय स्पर्धेत म्हणजेच मूट कोर्ट स्पर्धेत नियमितपणे भाग घेतल्याने विद्यार्थ्याला सामान्यत: वास्तविक कोर्टरूम मध्ये होणाऱ्या कार्यवाहीची ओळख होते, असे मत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सभासद ॲड. मंगेश खराबे यांनी व्यक्त केले.

Sangvi : बीआरटी मार्गावार पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

आंबी मध्ये नव्याने सुरू झालेल्या डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे स्कूल ऑफ लॉ (विधी महाविद्यालया) मध्ये ‘अभिरुप न्यायालय स्पर्धा व त्याचे महत्व’ या विषयावर ॲड. मंगेश खराबे बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सायली गणकर, प्रा. मयुरी फरकंडे, प्रा. अनुराधा सोनवणे आदि उपस्थित होते.

विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठ तसेच भारतीय वकील परिषदेच्या कार्यानुसार महत्वाचे असलेल्या लीगल फ्रेमवर्क व विधी विषयक शिक्षणाला प्रचालना देण्यासाठी राज्य तथा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत असलेले अभिरुप न्यायालय स्पर्धा ही महत्त्वाची असते या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड. मंगेश खराबे यांनी मार्गदर्शन केले.

ॲड. खराबे म्हणाले, अभिरुप न्यायालय स्पर्धा ही विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यास आणि कायदेशीर समस्या समजून घेण्यास मदत करते. तसेच स्पर्धेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कायदेशीर विषयांचे विश्लेषण करण्यास आणि त्याच्या संशोधनावर कार्य करण्यास मदत करतात.

याचा पुढे प्रॅक्टिस मध्ये देखील खूप उपयोग होतो. याच अनुषंगाने विधी क्षेत्रातील विद्यार्थी विधीसंघात सुद्धा काम करायला शिकतात. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या आपल्या इतर सहकाऱ्यांकडून देखील ते शिकत असतात.

विद्यार्थी त्यांचे भावी वकिली कौशल्य आणि कायदेशीर कौशल्ये स्पर्धेच्या माध्यमातून दाखवू शकतात. विद्यार्थी त्यांचा आत्मविश्वास आणि बोलण्याचे कौशल्य यातून सुधारू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुट कोर्ट स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन ॲड. खराबे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. अस्मिता साखले यांनी केले. प्राचार्या अंजली नदुमना यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.