Sangvi : बीआरटी मार्गावार पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पीएमपीएमएल बसने पुढून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात औंध येथील रक्षक चौकात बीआरटी मार्गावर सोमवारी (दि.14) झाला आहे.

Pune : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून केला खून

याप्रकरणी पीएमपीएमएल चालक ज्ञानेश्वर संपत बोरगे (वय 48 रा.येरवडा) याला अटक केली असून सांगवी (Sangvi) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात संदेश गणपत भंडदे (वय 39 रा. थेरगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश भंडदे हे त्यांच्या दुचाकीवरून पुण्याकडून औंधकडे येत सबवे पुलावरील वळणावरून येत होते. यावेळी पीएमपीएमएल बस चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून संदेश यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. सांगवी पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.