Panshet : पानशेत येथे नदी पात्रात तरुण बुडाला

एमपीसी न्यूज – पानशेत येथे नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी आलेला तरुण बुडाला. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी घडली.

अनिल लहू चव्हाण (वय 30, रा. भीमदीप झोपडपट्टी, बिबवेवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण हा त्याच्या कुटुंबासोबत पानशेत येथे नदीजवळ गोधड्या धुण्यासाठी गेला होता. गोधड्या धुण्यासाठी तो नदी पात्रात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो नदीत(Panshet) बुडाला.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. तानाजी भोसले, गणेश सपकाळ, गुलाब धोंडेकर, संदीप सोळसकर, संजय चोरगे, गणेश जाधव, विजय जावळकर, गणेश ओसवे, धनंजय सपकाळ यांनी अनिल चव्हाण याचा मृतदेह(Panshet) बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.