Pune : पुण्याच्या धरणांमध्य केवळ दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा

एमपीसी न्यूज – यंदा पाऊस हा सरासरीच्या 92 ते 95 टक्के  (Pune)झाला आहे. त्यामुळे गोल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के कमी पाणी साठी उपलब्ध आहे जो पुणेकरांची केवळ दोन मिहन्याची तहान भागवू शकतो.

 

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 95.19 टीएमसी (Pune)इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे 47.99 टक्के इतके होते.

Vijay Shivatare: वर्षा बंगल्यावर विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला; फडणवीसांच्या मध्यस्थीला यश

यावर्षी जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये मिळून बुधवारी (दि.27) अखेरपर्यंत 56.31 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचं हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ 28.39 टक्के इतके अल्प आहे. हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत 38.885 टीएमसीने कमी आहे.

 

जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 198.34 टीएमसी इतकी आहे.

 

प्रमुख धरणांमधील बुधवारचा साठा (टीएमसी मध्ये)

 

– टेमघर — 0.33

– वरसगाव — 6.64

– पानशेत — 4.96

– खडकवासला — 1.06

– पवना — 3.99

– चासकमान — 2.68

– भामा आसखेड — 3.65

– आंद्रा — 1.64

– गुंजवणी — 1.66

– भाटघर — 8.03

– नीरा देवघर —4.27

– वीर — 4.25

– माणिकडोह — 1.09

– येडगाव — 0.89

– डिंभे — 5.24

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.