LokSabha Elections 2024 : निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

एमपीसी न्यूज -लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघात नियुक्त ( LokSabha Elections 2024) अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय दुसरी सरमिसळ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

यावेळी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर , पुणे मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, जिल्हाधिकारी तथा  पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

Chinchwad : आयुक्तसाहेब! बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय कधी सुरू करणार?

मावळ मतदारसंघातील पुणे जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील 1 हजार 339 मतदान केंद्रासाठी 6 हजार 594 आणि रायगड जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील 1 हजार 227 मतदान केंद्रासाठी 5 हजार 448,  पुणे लोकसभा मतदारसंघाच्या 2 हजार 18 मतदान केंद्रासाठी 11 हजार 176 आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 509 मतदान केंद्रासाठी 11 हजार 586 अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

या सरमिसळ प्रक्रीयेच्या माध्यमातून संबंधित विधानसभा क्षेत्रातील पथक निश्चित झाले असून विधानसभा क्षेत्रस्तरावरील दुसऱ्या सरमिसळ प्रक्रीयेत मतदान केंद्रासाठी पथक निश्चित ( LokSabha Elections 2024) होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.