Pune: महानगरपालिकेच्या शाळा बंद न करण्याबाबत आदेश द्यावेत – माजी नागरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता संपेपर्यंत वाखारे मॅडम यांना(Pune) महानगरपालिकेच्या शाळा बंद न करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे.

यासंबंधीचे निवेदन आज पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे.

LokSabha Election 2024:  दिव्यांग बांधवांनी भव्य दुचाकी रॅलीद्वारे घडविला मतदान जनजागृतीचा अनोखा आदर्श

शिक्षण अधिकारी पुणे महानगरपालिका सौभाग्यवती सुनंदा वाखारे यांनी काही(Pune) मुख्याध्यापकांना फोन करून शाळेचा पट कमी करून त्यातील विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करून शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे.

सध्या लोकसभेची निवडणूक आहे. सगळे कार्यकर्ते,  माजी नगरसेवक, आमदार हे निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून असणारी शाळा नंबर 14 काँग्रेस जवळ गावठाण ही शाळा बंद करून त्या ठिकाणी लॅबोरेटरी काढण्याचे खाजगी सहभागात न ठरवले आहे, असेही या नागरसेवकांनी म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.