Kasarwadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून (Kasarwadi)जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.7) कासारवाडी येथे झाला आहे.

याप्रकरणी  सिकंदर कासिम बिजापुरे (वय 45 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  (Kasarwadi)आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LokSabha Election 2024:  दिव्यांग बांधवांनी भव्य दुचाकी रॅलीद्वारे घडविला मतदान जनजागृतीचा अनोखा आदर्श

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण ही दुचाकी वरून जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार  धडक दिली. यावेळी वाहन चालकाने तेथे थांबून मदत न करता तो पसार झाला. या अपघातात फिर्यादी यांची बहीण गंभीर जखमी झाली व तिचा मृत्यू झाला आहे. यावरून वाहन चालकावर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.