Shirur : शिरूर तालुक्यातील आपटी गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने माहिती(Shirur) मिळाल्यानुसार शिरूर तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात एक हजार 20 लीटर गावठी दारु, दोन हजार लीटर रसायनासह चारचाकी वाहन असा दहा लाख 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू झाल्यापासून राज्य उत्पादन (Shirur)शुल्क पुणे विभागाच्या पथकाने  आजपर्यंत अवैध गावठी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच अवैधपणे मद्य विक्री करणारे हॉटेल, ढाबे, अवैध ताडी  विक्री आदींवर कारवाई करून एकूण 83 गुन्हे नोंद केले आहेत. या गुन्ह्यांत दोन हजार 864 गावठी दारू, 43 हजार 700 लीटर रसायन, 247 लीटर देशी दारू, 164 लीटर विदेशी मद्य, 201 लीटर बीअर व आठ वाहने असा 49 लाख 99 हजार 195 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोंपीविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या तरतुदीनुसार गुन्हे नोंद केलेले आहेत.

Talegaon Dabhade: घरगुती, व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

ही कारवाई पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, संदेश तडवळेकर, कुलभूषण पाटील, अनिता तनपुरे, प्रियंका पानसरे, हेमा खुपसत, डी. एस. कुलकर्णी, जवान सुरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, प्रमोद पालवे, चंद्रकांत नाईक, महिला जवान शाहीन इनामदार, वंदना मारकड, अनिता नागरगोजे यांच्या पथकाने केली.

अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक देवदत्त पोटे यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.