Maval Loksabha Election : मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज;कोणत्या मतदारसंघात कशी तयारी झाली, वाचा सविस्तर

एमपीसी न्यूज – मावळ  लोकसभा मतदासंघात सोमवारी (दि. 13) मतदान होत असून सर्व (Maval Loksabha Election)घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी व चिंचवड तर रायगड जिल्ह्यातील (Maval Loksabha Election)पनवेल, कर्जत व उरण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. सिंगला यांनी दिली.

मतदानासाठी बोटीसह 525 वाहनांची व्यवस्था

मावळ लोकसभांतर्गत विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे 12 हजार मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह 175 पीएमपीएमल बसेस, 219 एसटी महामंडळाच्या बसेस, 105 मिनी बसेस, 25 ईव्हीएम कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

2 हजार 566 मतदान  केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर 83 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदानासाठी 9 हजार 581 बॅलेट युनिट, 3591 कंट्रोल युनिट आणि 3816 व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात 25 लाख 85 हजार मतदार

मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात 25 लाख 85 हजार 18 मतदार असून यामध्ये 13 लाख 49 हजार 184 पुरूष मतदार, 12 लाख 35 हजार 661 महिला मतदार आणि 173 तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात 33 उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 5 लाख 91 हजार 398 मतदार आहेत. त्यामध्ये 3 लाख 17 हजार 96 पुरूष, 2 लाख 74 हजार 231 महिला तर 71 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच पनवेल मतदारसंघात 544 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 404 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 2 हजार 62 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी 46 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 86 एसटी बसेस, 15 मिनी बसेस, 20 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशा 125 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 9 हजार 208 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 55 हजार 286 पुरूष, 1 लाख 53 हजार 917 महिला तर 5 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 339 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 500 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 320 बॅलेट युनिट, 467 कंट्रोल युनिट आणि 491 व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी 47 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 43 एसटी बसेस, 21 मिनी बसेस, 8 जीप, 6 ईव्हीएम कंटेनर अशी 78 वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 19 हजार 311 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 60 हजार 709 पुरूष, 1 लाख 58 हजार 593 महिला तर 9 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 344 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 520 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 1 हजार 341 बॅलेट युनिट, 474 कंट्रोल युनिट आणि 498 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी 60 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 41 एसटी बसेस, 22 मिनी बसेस, 28 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर आणि 1 बोट अशी 96 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

MSEB : महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट 24 तास उपलब्ध, ग्राहकांना माहिती व तक्रारीसाठी होणार मदत

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 73 हजार 408 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 91 हजार 702 पुरूष, 1 लाख 81 हजार 693 महिला तर 13 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 390 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 732 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 422 बॅलेट युनिट, 553 कंट्रोल युनिट आणि 592 व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी 45 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 49 एसटी बसेस, 27 मिनी बसेस, 20 जीप, 3 ईव्हीएम कंटेनर अशी 99 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 लाख 18 हजार 245 मतदार असून त्यामध्ये 3 लाख 27 हजार 961 पुरूष, 2 लाख 90 हजार 239 महिला तर 45 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 549 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 436 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर 1 हजार 976 बॅलेट युनिट, 779 कंट्रोल युनिट आणि 839 व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 48 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 102 पीएमपीएमएल बसेस, 20 मिनी बसेस, 16 जीप, 4 ईव्हीएम कंटेनर अशी 142 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 73 हजार 448 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 96 हजार 430 पुरूष, 1 लाख 76 हजार 988 महिला तर 30 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून 400 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 776 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांसाठी 1 हजार 460 बॅलेट युनिट, 568 कंट्रोल युनिट आणि 608 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी 45 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. 73 पीएमपीएमएल बसेस, 1 जीप, 1 ईव्हीएम कंटेनर अशी 78 वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.